नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकच्या चालकाला डुलकी आल्याने ट्रक पुलाच्या कठड्याला धडकला. यात चालक व वाहक जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री १ वाजता समृद्धी महामार्गावर मांजरखेड गावाजवळ घडली. चालक मोहम्मद फैजान मोहम्मद अली (४८) व वाहक मोहम्मद ममताज मोहम्मद शेख (४६, दोन्ही रा. शेरघाटी जिल्हा. बोधगया, बिहार) अशी मृतकांची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तळेगाव दशासर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...