सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन या गाण्याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. मात्र, या नविन गाण्यापेक्षा अमृता फडणवीस यांच्या इंडो वेस्टर्न लूकचीच जास्त चर्चा होत आहे. लवकरच हे गाण प्रदर्शित होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवीन वर्षातील नवं गाण लवकरचं त्यांच्या भेटीला येणार आहे. अमृता फडणवीस यांनी स्वत: सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन या गाण्याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. मात्र, या नवीन गाण्यापेक्षा अमृता फडणवीस यांच्या इंडो वेस्टर्न लुकचीच जास्त चर्चा होत आहे. लवकरच हे गाण प्रदर्शित होणार आहे.
“अज मैं मूड बना लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे!!” असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यातील अमृता यांचा लुक कसा असेल याची एक झलक अमृता यांनी पोस्टमध्ये लिहीली आहे. येत्या 6 जानेवारीला ‘टी सीरिज’चं हे गाणं प्रदर्शित होणार आहे.
अज मैं मूड बना लेया ए ए ए , तेरे नाल ही नचणा वे !! An electrifying , Biggest Bachelorette Anthem of the Year …… अस कॅप्शन अमृता यांनी या पोस्टला दिले आहे. या कॅप्शनमध्येच सारं काही आलं आहे. हे नवीन गाणं बॅचलर्सवर आधारित असल्याचे पोस्टवरुन स्पष्ट होत आहे. या गाण्यात अमृता यांचा अत्यतं हटके लूक पहायला मिळणार आहे. यामुळे चाहत्यांची या गाण्याबद्दलची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.