अमेरिकेतील लेविस्टन शहरात झालेल्या गोळीबारात २२ जणांचा मृत्यू झाला.तर ६० जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर हल्लेखोर फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.नागरिकांनी दरवाजे बंद करून घरातच राहावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. हल्लेखोर फरार असल्याने सुरक्षेच्या दुष्टीकोनातून लेविस्टनमधील शाळांनाही आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा गोळीबार बॉलिंग अॅलेतील स्पेयरटाइम रिक्रिएशन आणि स्कीमेंजीस बार व ग्रिल या रेस्टॉरंटमध्ये झाला. अज्ञात हल्लेखोराने अचानकपणे अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरूवात केली होती. अँड्रॉस्कोगिन काउंटी शेरीफच्या कार्यालयाने गोळीबार करणाऱ्या संशयिताची दोन छायाचित्रे फेसबुकवर शेअर केली आहेत. तसेच संशयिताची ओळख पटवण्यासाठी मदत करा असे आवाहन अधिका-यांनी जनतेला केले आहे.