सुरेश काशिदे -: नांदेड-बिलोली तालुक्यातील सगरोळी परिसरात दि. ८ नोव्हेंबर रोजी अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. या घटनेचा तपास करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून या घटनेतील आरोपी स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने कामारेड्डी येथून अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बिलोली तालुक्यातील सगरोळी परिसरात दि. ८ नोव्हेंबर रोजी एका आनोळखी इसमाचा अर्धवट जळालेल्या आवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मयत व्यक्ती अर्धवट जळाला असल्याने मयताची ओळख पटवणे व मारेकर्याचा शोध घेणे हे पोलीसासमोर आव्हान होते. स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी या खुनाच्या तपासासाठी दोन पथके तयार केली. सिमावृत्ती भागातील प्रत्येक गावात जावून संपर्क साधला. दरम्यान दि. १९ नोव्हेंबर रोजी तेलंगणा राज्यातील मिर्झापूर येथील एका इसमाने हा खुन केल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिर्झापूर येथे जावून महेंदर नारायणा बोब्बास्वामी यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता गणेश व्यंकय्या चुंचु रा. नसरुलाबाद जि. कामारेड्डी हा त्याच्या जवळची मोटर सायकल देत नसल्याच्या रागात त्याचा खुन करून जाळून मारल्याची कबुली त्याने दिली. आरोपी महेंदर नारायणा यास अटक करून बिलोली पोलीस ठाण्याच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडुरूंग माने, पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे, पोहेका गुंडेराव करले, संजय केंद्रे, शंकर म्हैसनवाड, पोकॉ. देवा चव्हाण, महेश बडगु, मोतीराम पवार, तानाजी यळगे, बजरंग बोडके, रवि बाबर, राजु सिटीकर, दिपक ओढणे, अच्चुत मोरे, हेमंत बिचकेवार, दादाराव श्रीरामे यांच्या पथकानी पार पाडली.