अहमदपूर – सुरेश डबीर :- काँग्रसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असताना खा.राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या विधना मुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले. त्याचाच एक भाग म्हणून अहमदपूर शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास विविध हिंदू संघटना, विविध पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुतळा व परिसराची पाण्याने स्वच्छता करून दुग्धाभिशेक केला.
पुष्पहार अर्पण करुन गुलाल उधळत जय श्रीराम, भारत माता की जय, सावरकर जिंदाबाद च्या घोषणा देऊन वंदेमातरम गाण्यात आले.भा ज पा चे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके यांनी काँग्रेस च्या भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी सावकारांच्या विषयी जे बेताल वक्तव्य केले त्याच्या निषेध केला. राहुल गांधी यांनी जाणीव पूर्वक केलेल्या अपमानजनक वक्तव्याचा निषेध देशभर केला जात आहे. आम्ही राजूर मध्ये राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले.