Wednesday, June 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

‘मोबाईल व्यसनाधीनता आणि अभ्यास’ विषयावर विशेष पालक सभा

तरुण भारतbyतरुण भारत
March 3, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – मुलांना मोबाईलचे गुलाम न बनवता ओळखा आणि वेळीच सावरा,  त्यांना स्मार्ट बनवा’; डॉ. गजानन खरात यांचे पालकांना आवाहन मुलांनी रविवारी फक्त अर्धा तास मोबाईल वापरण्याची शपथ घेतली. शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना ठाकरे यांच्या प्रेरणेने ठाकरे किड्स स्कूलमध्ये ‘मोबाईल व्यसनाधीनता आणि अभ्यास’ विषयावर विशेष पालक सभा संपन्न झाली.


     याप्रसंगी डाॅ.गजानन खरात सर हे प्रमुख पाहुणे तर अध्यक्ष स्थानी संदिप ठाकरे हे होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रावणी पिसाळ मॅडम यांनी केले.
  यावेळि कार्यक्रमाचे प्रमुख पाहणे व व्याख्याते डाॅ.गजानन खरात सर यांनी पुढिल प्रमाणे मार्गदर्शन केले,  आजच्या डिजिटल युगात मोबाईल हे संवादाचे साधन न राहता ते मुलांसाठी एक व्यसन बनत चालले आहे. मुलांच्या हातातील मोबाईल सोडवून त्यांना अभ्यासाकडे वळवायचे असेल, तर केवळ मुलांना दोष देऊन चालणार नाही, तर पालकांना आपल्या घरातील वातावरण बदलावे लागेल, स्वतः आदर्श बनून मुलांसमोर स्वतःचा स्क्रीन टाईम कमी करावा, असे प्रतिपादन प्रसिद्ध क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि करिअर समुपदेशक डॉ. गजानन खरात जिल्हा ताणतणाव नियंत्रण समितीचे सदस्य यांनी केले.
येथील ‘ठाकरे किड्स स्कूल’मध्ये आयोजित ‘मुलांचा मोबाईल वापर टाळून अभ्यासास प्रोत्साहित करणे’ या विषयावरील विशेष पालक मार्गदर्शक सभेत ते बोलत होते. सायंकाळी ६ ते ८ या वेळेत संपन्न झालेल्या या सभेला पालकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
मोबाईल आणि डोपामाईनचा खेळ
मार्गदर्शन करताना डॉ. खरात यांनी मुलांच्या मेंदूवर होणाऱ्या परिणामांची मानसशास्त्रीय माहिती दिली. ते म्हणाले की, “मोबाईलवर गेम्स खेळताना किंवा रिल्स पाहताना मुलांच्या मेंदूतून ‘डोपामाईन’ नावाचे रसायन स्रवते, जे त्यांना त्वरित आनंद देते. यामुळे मुलांना अभ्यासासारख्या संथ पण शाश्वत गोष्टी कंटाळवाण्या वाटू लागतात. हे टाळण्यासाठी पालकांनी मुलांना ‘डिजिटल बेबीसिटर’ म्हणून मोबाईल देणे थांबवले पाहिजे.”
पालक की घरातील वातावरण?
यावेळी त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की, मुलांच्या या सवयीला केवळ पालकच नाही, तर घरातील संवादहीन वातावरण जबाबदार आहे. मुले ऐकून कमी आणि पालकांना बघून जास्त शिकतात. जर पालक स्वतः मुलांसमोर सतत मोबाईल वापरत असतील, तर मुले त्याचेच अनुकरण करणार. त्यामुळे घरात ‘नो-स्क्रीन झोन’ तयार करा आणि जेवताना व झोपताना मोबाईल पूर्णपणे बंद ठेवा, असा सल्ला त्यांनी पालकांना दिला.
शिक्षक आणि पालकांचा समन्वय गरजेचा
विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षक आणि पालक ही एकाच रथाची दोन चाके आहेत. शिक्षकांनी अभ्यासाला रंजक बनवणे आणि पालकांनी घरात अभ्यासासाठी पूरक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. घरात गोष्टीची पुस्तके, बैठे खेळ , छंद जोपासणे, मुलांच्या छोट्या यशाचे ही कौतुक करणे, ज्यामुळे त्यांना अभ्यासाची गोडी लागेल, असेही डॉ. खरात यांनी नमूद केले.
पालकांसोबत केलेल्या सर्वे नुसार मोबाइल वापराचा मुलांच्या  शारीरिक आरोग्यावर चिडचिडेपणा रागावणे 53% चित्त एकाग्र न होणे 33%, डोळ्यांच्या समस्या 23%, अभ्यासात लक्ष न लागणे 53%, झोप न येणे उशिरापर्यंत झोपणे  23% मुलांवर परिणाम झाला आहे हे निदर्शनास आले आहे. 4 तासात पर्यंत मोबाईल बघणारे मुले ही 3% टक्के आढळून आले आहे.ते रिस्क झोन मध्ये आहेत.
मोबाईल रिस्क कमी करण्यासाठी उपाय सुचवताना त्यांनी नो स्क्रीन झोन ऐवजी स्टडी झोन तयार करावा. दैनंदिन वेळापत्रक ठरवून त्यानुसार अभ्यासाला बसणे, पुस्तक वाचणे छोटी छोटी ध्येय ठरवणे बैठी खेळ खेळणे आऊटडोअर गेम साठी जाणे , निसर्गाच्या सानिध्यात जाऊन येणे बाग बगीचे प्रेक्षणीय स्थळे यांना भेट देणे, तंत्रज्ञानाचा स्मार्ट वापर करा, नातेवाईकांना भेटण्यासाठी जाणे. दिवसभरातील किमान अर्धा तास कॉलिटी टाईम मुलांना द्या त्यात निवांत गप्पा मारा त्यांच्या भावना समजून घ्या. असा सल्ला डॉ. गजानन खरात यांनी दिला
   कार्यक्रमाच्या शेवटि मुलांनी रविवारी फक्त अर्धा तास मोबाईल वापरण्याची शपथ घेतली.
    कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पालकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना डॉ. खरात यांनी शंका समाधान केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक रंजना ठाकरे व राजश्री माचेवार, स्मिता टाकाळकर, माधुरी नामदे, मोनिका शहाणे, प्रतिक्षा कनकुटे, रसिका दिक्षित, आदिती लोळगे, वैष्णवी पोटाबत्तीन, श्रावणी पिसाळ, शीला राऊत व संजीवनी सोनवणे इत्यादि शिक्षक वृंद परिश्रम घेतले.
       मोठ्या संख्येने पालक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शाळेच्या वतीने करण्यात आले.

Post Views: 122
Previous Post

धर्मवीर बलिदान मासामुळे छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या बलिदानाचे स्मरण

Next Post

तिरळेपणा मुक्त समाजासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक – डॉ. मधुसूदन झंवर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

तिरळेपणा मुक्त समाजासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक – डॉ. मधुसूदन झंवर

ताज्या बातम्या

अल-निनोच्या पार्श्वभूमीवर मान्सून लांबणीची शक्यता; पाणी काटकसरीने वापरावे    -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

अल-निनोच्या पार्श्वभूमीवर मान्सून लांबणीची शक्यता; पाणी काटकसरीने वापरावे    -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 17, 2026
आर्ट ऑफ लिव्हिंगचा सहज समाधी ध्यान योग उत्साहात संपन्न

आर्ट ऑफ लिव्हिंगचा सहज समाधी ध्यान योग उत्साहात संपन्न

June 17, 2026
आवताडे स्पिनर्स प्रा.लिमिटेड येथे कामगारांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

आवताडे स्पिनर्स प्रा.लिमिटेड येथे कामगारांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

June 17, 2026

खासदारांच्या पक्षांतरावरून शिवसैनिक संतप्त; भाजप-शिंदे गटावर लोकशाही खच्चीकरणाचा आरोप

June 17, 2026
रक्तदान व आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

रक्तदान व आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

June 17, 2026

राजमाता जिजाबाईंच्या कार्यापासून राष्ट्रसेवा आणि संस्कार मूल्यांचा आदर्श घ्यावा 

June 17, 2026
महिला वारकऱ्यांसाठी उभारणार जर्मन हँगर्स सदस्या ॲड . निगडे यांच्या सूचनेला तात्काळ मंजुरी 

महिला वारकऱ्यांसाठी उभारणार जर्मन हँगर्स सदस्या ॲड . निगडे यांच्या सूचनेला तात्काळ मंजुरी 

June 17, 2026
लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

June 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

byतरुण भारत
June 14, 2026
0

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0914935

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697