Thursday, February 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्याचा आढावा घेतला

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 1, 2022
in marathwada
0
आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्याचा आढावा घेतला
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी आज उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट देऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य यंत्रणेचा आढावाही घेतला.
यावेळी त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांशी संवाद साधला त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातून औषधे आणि उपचार व्यवस्थित मिळतात का? याचा स्वतः अनुभवही घेतला.
यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाचा आढावा जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेतला. त्यात त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या संदर्भात नागरिकांकडून आलेल्या तक्रारी आणि त्यावर करावयाच्या उपायोजना याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हा सामान्य रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याचे लक्षात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तसेच त्यावर उपाय म्हणून डॉक्टरांनी उपलब्ध असलेली औषधेच रुग्णांना घेण्यासाठी लिहून द्यावीत आणि आवश्यक असणारी औषधे मागवण्यात यावी, रुग्णांना उपलब्ध करून देण्यात यावी असे निर्देशही त्यांनी दिले.


यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डॉक्टर भारती पवार यांनी उस्मानाबाद हा आकांक्षित जिल्हा आहे या जिल्ह्यातील आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार या जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालय तात्काळ मंजूर करण्यात आल्याचे सांगितलं.
आकांक्षीत जिल्हा म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातील माता बालमृत्युदरात घट होत असून संस्थात्मक प्रसूतीत मोठी वाढ होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं. आरोग्य सुविधा गावोगावी पोहोचवल्या जात असून रुग्णांना आवश्यक त्या दर्जेदार वैद्यकीय सुविधा , तसंच दर्जेदार वैद्यकीय शिक्षण मिळावं या उद्देशाने पंतप्रधानांच्या आग्रहांनुसार वैद्यकीय महाविद्यालय उस्मानाबादला मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं.
उस्मानाबाद जिल्ह्यात 15 व्या वित्त आयोगातून सात ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तर शहरी भागासाठी 18 ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्यासाठी 15 कोटींचं बजेट मंजूर झाल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातून मागील वर्षी उस्मानाबाद जिल्ह्याला 49 कोटी तर यावर्षी 34 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असल्याचे सांगितल.
केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व जिल्हा सामान्य रुग्णालयात औषधांची मागणी तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले असल्याचे तसेच दररोजच्या उपचारांसाठी लागणारी औषधं उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिल्याचे तसच दवाखान्यात उपलब्ध आहेत तीच औषधे डॉक्टरांनी रुग्णांना लिहून देण्याची शिफारस करण्याची निर्देश दिल्याचेही डॉक्टर भारती पवार यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं.
या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कुलदीप मिटकरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलांडे , जिल्हाध्यक्ष नितीन काळे जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष सौ अर्चनाताई राणा जगजीत सिंह पाटील मान्यवर उपस्थित होते.

Post Views: 97
Previous Post

बेळगावात विद्यार्थ्यांच्या भांडणाला सीमावादाचा रंग, कन्नड संघटनांनी रोखला महामार्ग….

Next Post

नागपुरमध्ये सुपारी व्यावसायिकांवर ईडीची छापेमारी..

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
नागपुरमध्ये सुपारी व्यावसायिकांवर ईडीची छापेमारी..

नागपुरमध्ये सुपारी व्यावसायिकांवर ईडीची छापेमारी..

ताज्या बातम्या

विलनिकरण पुढचं पुढे पाहूया खा. सुप्रिया सुळे..

February 12, 2026

माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांचासातपुतेंवर पलटवार जानकर म्हणाले मुर्दाडा ला मारण्यात काय.? #bjp

February 11, 2026

येलदरी रस्त्यावर दुचाकीची समोरासमोर धडक चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत..

February 11, 2026

कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या एम पी एल मध्ये माहूरगडचा श्री रेणुका देवी क्रिकेट संघ खेळणार.#viral

February 11, 2026

माहूर येथे होणार 100 खा टांसह. सर्व सुविधा उपलब्ध.#viral #public

February 11, 2026

कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त पारगाव येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

February 11, 2026

मला हत्येच्या कटाची माहिती नव्हती.#viral #public #trending #bjp

February 11, 2026

शिवजन्मोत्सव पाळणा सोहळा तयारीला वेग ! राष्ट्रमाता जिजाऊंच्या वेशभूषेत सहभागी होणार ! #public

February 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0676155

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697