दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिना नदी व कुरूल कॅनॉलमध्ये पाणी नसल्याकारणाने परिसरातील शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच उन्हाळा असल्या कारणाने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील उदभवलेला आहे. सध्या तीव्र उन्हाळा असताना देखील पाटबंधारे विभागामार्फत सिना नदी व कुरूल कॅनॉलमध्ये टेल एंडपर्यंत पाणी सोडलेले नाही.
या उदभवलेल्या पाण्याच्या प्रश्नी दक्षिण सोलापूर तालुक्याचे भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी शेतकऱ्यांना घेऊन सिंचन भवन, गुरूनानक चौक या ठिकाणी ठिय्या आंदोलन केले. तत्पूर्वी या उदभवलेल्या पाण्याच्या प्रश्नी दक्षिण सोलापूर तालुक्याचे भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी शनिवारी शेतकऱ्यांना घेऊन सिंचन भवन, गुरूनानक चौक या ठिकाणी ठिय्या आंदोलन केले.
यावेळी उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे व उपविभागीय अधिकारी शिरीष जाधव यांनी देशमुख यांच्याशी बराच वेळ चर्चा केली पण तोडगा निघाला नाही, जोपर्यंत पाणी सोडत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.
शेवटी आमदार देशमुख यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच फोन लावला, स्पीकर मोठा करून शेतकऱ्यांशी बोलताना फडणवीस म्हणाले, माझे आणि आमदार देशमुख यांच्यासोबत चर्चा झाली असून मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो आहे, पाणी आजपासून चालू करतोय, येत्या दोन ते तीन दिवसात पाणी येईल,असे म्हणतात शेतकऱ्यांनी सुभाष बापू तुम आगे बढो….च्या घोषणा दिल्या