भारत आसियान-20 शिखर परिषद आणि पूर्व आशिया शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया दौऱ्यावर आहेत. यावेळी राजधानी जकार्ता येथे पंतप्रधानांचे पारंपारिक पद्धतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले.
आसिआन ही भारताच्या ऍक्ट इस्ट पॉलीसी साठी महत्वाचा भाग आहे. भारताची पॉलीसीचा अवलंब करण्यात आसिआन समूह मध्यवर्ती भूमिका पार पाडतो. इंडोनेशिया येथे आसियान-भारत शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपला इतिहास आणि भूगोल भारत आणि आसियान यांना एकत्र आणतो. त्यासोबतच आपली मूल्ये, प्रादेशिक एकात्मता आणि शांतता, समृद्धी आणि बहुध्रुवीय आपल्याला एकत्र करते. भारत- आसियान आणि इंडो-पॅसिफिक याविषयी आसियानच्या दृष्टिकोनाचे भारत समर्थन करतो. आपल्या भागीदारीचे हे चौथे दशक आहे. या शिखर परिषदेचे सह-अध्यक्षपद भूषवणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. या शिखर परिषदेचे आयोजन केल्याबद्दल मी इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांचे अभिनंदन करू इच्छितो.आसियान महत्त्वाचा आहे कारण येथे प्रत्येकाचा आवाज ऐकला जातो आणि आसियान हा विकासाचा केंद्रबिंदू आहे कारण आसियानची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे या वर्षीची थीम “ASEAN Matters: Epicentrum of Growth” अशी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 व्या आसियान-भारत शिखर परिषद आणि 18 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेला उपस्थित होण्यापूर्वी आज भारतीय वंशाच्या नागरिकांची भेट घेत संवाद साधला आहे. महत्वाचे म्हणजे इंडोनेशियन समुदायाच्या सदस्यांनी पतंप्रधान मोदींचे जंगी स्वागत केले आहे.