तुळजापुर तालुक्यातील मौजे इटकळ येथील राष्ट्रीय महामार्गावर भर दिवसा महिलेच्या डोक्यावरील पैश्याची पिशवी मोटार सायकल वरील दोन चोरटयांनी केली लंपास ही घटना मौजे इटकळ येथील राष्ट्रीय महामार्गावर दुपारच्या सुमारास घडली.
अधिक माहिती अशी की मौजे इटकळ येथील श्रीमती अजिजाबी काशिमशा मकानदार ही महीला पतीच्या उपचारासाठी पैसे लागतात म्हणून अणदूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेत जाऊन खात्यावरील तीस हजार रुपये घेतले आणि ती परत अणदूर येथून टमटम रिक्षाने इटकळ येथे आली व बस स्टँड वरील किराणा दुकानात जाऊन थोडा किराणा सामान घेऊन ती पिशवी व पैसे ठेवलेली पिशवी अशा दोन्ही पिशव्या डोक्यावर ठेऊन घरी जाऊ लागली
त्यावेळेस राष्ट्रीय महामार्गावरच पाठीमागून मोटार सायकल वर दोन अज्ञात तरूण आले आणि लगेच आजिजाबी मकानदार यांच्यां डोक्यावरील पैश्याची पिशवी हिसका मारून ओढून घेतली आणि दोन्ही चोरटे पसार झाले यावेळी आजिजाबीने आरडा ओरड केली त्यावेळी काही तरुणांनी त्या चोरट्यांचा पाठलाग केला पण ते मिळून आले नाहीत. या घटनेची नोंद इटकळ औट पोस्ट येथे झाली असुन पोलीस तपास करीत आहेत.