राज्य कर्मचाऱ्यांचे जुनी पेन्शन मागणीसाठी आंदोलन चालूच , आज कर्मचाऱ्यांनी थाळीच्या तालावर लेजिमचा ठेका धरून आज सातव्या दिवशीही आंदोलन सुरू ठेवले आहे.
उमरगा येथील पंचायत समिती कार्यालयातही कर्मचाऱ्यांचे आंदोलन चालू आहे. या संपामध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षक , महसूल , कृषी , ग्रामविकास , भूमिअभिलेख , सार्वजनिक बांधकाम विभाग , जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कर्मचारी , पाणी पुरवठा सह इतर विभागाचे कर्मचारी सहभागी झाले आहेत . एकीकडे शासन मार्ग काढू म्हणत वेळकाढू पणा करत आहे . तर कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत .
























