इंदापूरच्या एका शेतकऱ्यानं आपल्या कामगिरीनं थेट पवारांनाच भुरळ पाडलीय. कळस येथील मधुकर खर्चे या शेतकऱ्यानं ऊसाचं सलग नववं पीक घेतलंय, दरवर्षी प्रति एकरी १०० टन उत्पन्न घेण्याचा या शेतकऱ्याचा विक्रम आहे. खुद्द शरद पवारांनाही या शेतकऱ्याची दखल घेत त्यांच्या या शेताला भेट दिलीय. कृषी क्षेत्राला मिळालेली उभारी ही शेतकऱ्याच्या प्रयोगशीलमुळेच आहे. आधुनिक शेतीची कास धरत नव्या नव्या प्रयोगांच्या मदतीने सर्व आव्हातून मार्ग काढणारा शेतकरी आज अभूतपूर्व यश मिळवतोय. इंदापूरातील शेतकरी मधुकर खर्चे हे असंच एक नाव.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















