शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील उस्मानाबाद जिल्हा संपर्कप्रमुख श्री अनिल खोचरे यांनी काल रात्री मुंबई येथे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री श्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले उपस्थित होते. श्री अनिल खोचरे हे मागील अनेक वर्षापासून शिवसेनेशी एकनिष्ठ असून त्यांनी विद्यार्थी सेनेचे अनेक वर्ष जिल्हाप्रमुख पदही त्यांनी सांभाळले आहे. त्यांच्या शिंदे गटात जाण्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...