मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज इर्शाळवाडीतील ग्रामस्थांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात आलेल्या निवारा केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी या ग्रामस्थांचे ज्या कंटेंनरमध्ये तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले होते त्याची देखील त्यांनी पाहणी केली. मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय यावेळी पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला.
या पाहणी दरम्यान एका घरात अभ्यासाला बसलेली एक चिमुरडी त्यांना दिसली. त्यांनी या मुलीच्या बाजूला बसून तिची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच तिला चांगला अभ्यास करायचा असे बजावत त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवून तिची रजा घेतली.
Post Views: 69