आयुष्यात कितीही अडचणी येत असल्या तरी कठोर परिश्रम आणि झोकून देऊन प्रयत्न केले तर आणखी मोठे यश मिळू शकते. अनेक लोक आहेत जे मोठ्या अडचणींनाही धैर्याने सामोरे जातात आणि यश मिळवतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, जो एकेकाळी बसमध्ये आणि घरोघरी पेन विकायचा, पण आज तो हजारो कोटींच्या कंपनीचा मालक बनला आहे. आज जग त्यांना भारतातील इन्व्हर्टर मॅन म्हणून ओळखते. Su-Kam कंपनीचे संस्थापक कुंवर सचदेव यांबद्दल बोलत आहोत. त्यांच्या कंपनीच्या सोलर उत्पादनांना भारतातच नाही तर परदेशातही मागणी जास्त आहे.
शिक्षणासाठी पेन विक्री
कुंवर सचदेव यांचे वडील रेल्वेत लिपिक होते. कुंवर सचदेव यांनी प्राथमिक शाळेपर्यंतचे शिक्षण खासगी शाळेत केले, मात्र पैशाअभावी त्यांना पुढील शिक्षण सरकारी शाळेत पूर्ण करावे लागले. कुंवर यांना डॉक्टर व्हायचे होते. मात्र वैद्यकीय प्रवेश न मिळाल्याने त्यांनी हे स्वप्न सोडून दिले. अभ्यासाचा खर्च भागवण्यासाठी कुंवर यांनी घरोघरी पेन विकले होते.
अशी केली व्यवसायाची सुरुवात
शिक्षण पूर्ण केल्यानंतर कुंवर एका केबल कम्युनिकेशन कंपनीच्या मार्केटिंग विभागात काम करू लागले. येथेच त्यांना देशातील केबल व्यवसाय भविष्यात खूप फायदेशीर ठरू शकेल असे वाटले. यानंतर त्यांनी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. कुंवर सचदेव यांनी Su-Kam कम्युनिकेशन सिस्टीम या नावाने व्यवसाय सुरू केला.
इन्व्हर्टर कंपनी
कुंवर सचदेव यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या घरात इन्व्हर्टर होता. तो पुन्हा पुन्हा खराब व्हायचा. एकदा त्यांनी तो स्वतः उघडला, तेव्हा त्यांना समजले की ही समस्या निकृष्ट दर्जाच्या सामग्रीमुळे आहे. यानंतर त्यांनी स्वतः इन्व्हर्टर बनवण्याचा विचार केला आणि १९९८ मध्ये त्यांनी Su-Kam पॉवर सिस्टम नावाची कंपनी स्थापन केली आणि इन्व्हर्टर बनवण्यास सुरुवात केली. आता कुंवर सचदेव यांची कंपनी अनेक सोलर उत्पादने बनवते. ज्याची मागणी भारतातच नाही तर परदेशातही आहे.