एसटी महामंडळाचा सदिच्छा दूत (ब्रॅण्ड अम्बेसेडर) पदाचा वनवास तब्बल २० वर्षांनंतर संपला आहे. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर सदिच्छा दूत म्हणून मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते मकरंद अनासपुरे त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. सन २००३ साली महामंडळाचे सदिच्छा दूत म्हणून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. आता तब्बल २० वर्षांनी त्या जागी मकरंद अनासपुरे यांची निवड करण्यात आली आहे. राज्य सरकार एसटीच्या माध्यमाने विविध प्रवास सवलती प्रवाशांसाठी लागू करतं. या योजनांची, सवलतींची माहिती सदिच्छा दूताच्या माध्यमाने राज्यातील खेडोपाडी पोहोचवण्यात येते. आता या कामासाठी मंकरंद यांची निवड करण्यात आली आहे. ग्रामीण भागाची जाण असलेला, स्पष्ट वक्ता आणि दांडगा जनसंपर्क आणि एसटीने प्रवास केलेला असे एसटी महामंडळाच्या सदिच्छा दूताचे निकष होते. त्यात मकरंद अगदी योग्य ठरले.
स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान
राज्यात ५८० एसटी स्थानके आहेत. महिला सन्मान योजना आणि अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंमुळे एसटीच्या प्रवाशांमध्ये वाढ झाली आहे. एसटीच्या योजनांना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. एसटीच्या योजनांना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र स्थानक परिसर अस्वच्छ, स्वच्छतागृहे दुर्गंधीयुक्त असल्याने प्रवाशांच्या तक्रारी वाढलेल्या आहेत.एसटी स्थानकांत मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याने एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. यामुळे स्वच्छ बस स्थानक मोहीम राबवण्यात येत आहे. प्रवाशांना स्वच्छ बस स्थानकात वावर करता यावा, यासाठी महामंडळाने राज्यात स्वच्छ बस स्थानक मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दोन कोटींची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.
अशाच अनेक योजना गावोगावी पोहोचवण्याचं काम हे सदिच्छा दूत करत असतो. शासनाच्या योजना या लोकांपर्यत पोहोचवण्यासाठी त्याची प्रसिद्धी करत असतो. आता ती जबाबदारी मकरंद अनासपुरे यांच्या खांद्यावर आहे. शासनाच्या या निर्णयाचं प्रेक्षकांनीही स्वागत केलं आहे. या पदी निवड आल्याबद्दल मकरंद यांना प्रेक्षक शुभेच्छा देत आहेत.