सोलापूर : येथील एन. के. ऑर्कीड अभियांत्रिकी महाविद्यालयातील यंदाच्या वर्षी सहा विद्यार्थ्यांची एम. एस. या परदेशी पदव्युत्तर शिक्षणासाठी विविध देशांमध्ये निवड झाली आहे. तसेच गेल्या वर्षी सात विद्यार्थ्यांची एम. एस. साठी निवड झाली आहे. ‘ऑर्कीड अभियांत्रकीचे आठ ते दहा विद्यार्थी दर वर्षी उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये जातात, या वर्षीही ही परंपरा कायम आहे.
‘ऑर्कीड अभियांत्रिकी’तून अभिषेक क्षीरसागर याची जर्मनी येथील फ्रायबर्ग विद्यापीठामध्ये मास्टर्स ऑफ सायन्स स्सटेनेबल इंजिनिअरिंग या कोर्ससाठी निवड झाली आहे. चैतन्य कुलकर्णी याची इंग्लंड येथे किंग्स्टन विद्यापीठामध्ये मास्टर्स ऑफ सायन्स इन प्रोजेक्ट अॅण्ड सिस्टीम मॅनेजमेंट या कोर्ससाठी निवड झाली आहे. हर्षल कुलकर्णी याची जर्मनी येथील फ्रेजेनियस या विद्यापीठामध्ये मास्टर्स ऑफ सायन्स इन इंडस्ट्रीयल इंजीनियरिंग अॅण्ड इंटरनॅशनल मॅनेजमेंट या कोर्ससाठी निवड झाली.
ओंकार सुतार याची जर्मनीतील टेक्निकल युनिर्व्हसिटी बर्लिन या विद्यापीठामध्ये मास्टर्स इन ग्लोबल प्रॉडक्शन इंजिनिअरिंग या कोर्ससाठी निवड झाली. या सर्व चारही विद्यार्थ्यांनी मेकॅनिकल विभागातून पदवी प्राप्त केली आहे.
अनुप शास्त्री या संगणक विभागातील विद्यार्थ्याची कॅनडा येथील न्यू ब्रुनस्विक विद्यापीठातून मास्टर्स इन कॉम्प्युटर सायन्स या कोर्ससाठी निवड झाली आहे. मृणाल गांगजी या विद्यार्थ्याची स्थापत्य विभागातून मास्टर्स ऑफ सायन्स स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मिशीगन स्टेट विद्यापीठात या कोर्ससाठी निवड झाली.
तसेच गेल्या वर्षी सात विद्यार्थ्यांची पल्लवी सोलापुरे (मेकॅनिकल), शिवप्रसाद बबलादे (मेकॅनिकल), अनिरूध्द शिरसिकर (मेकॅनिकल), आकिब अवेस शेख ( (मेकॅनिकल), रामेश्वर उदगिरी (मेकॅनिकल), संतोष कोळी (मेकॅनिकल) व प्रियंका मोरे (इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन) जगातील वेगवेगळ्या नामांकित विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे.
“ऑर्किड अभियांत्रिकी’च्या अनेक विद्यार्थ्यांना चांगल्या शिष्यवृत्ती मिळत आहेत. गेल्या दोन वर्षात परदेशातील वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये उच्च शिक्षण घेण्यास ‘आर्किड अभियांत्रिकी’चे तेरा विद्यार्थी सज्ज झाले असून, हे विद्यार्थी परदेशातदेखील ‘ऑर्किड अभियांत्रिकीचा’चा ठसा उमटवतील,’ असा विश्वास प्रभारी प्राचार्य डॉ. बी. के. सोनगे यांनी व्यक्त केला.
ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अनेक वर्षांपासून स्टडी अब्रोड सेल हा उत्तमरित्या कार्यरत आहे. या स्टडी अब्रोड सेलचे प्रमुख डॉ. श्रीनिवास मेतन हे स्वतः जर्मनी येथील आखन युनिव्हर्सिटीमधील पदव्युत्तर शिक्षण प्राप्त आहेत. त्यामुळे त्यांचा या क्षेत्रातील अनुभव अनेक वर्षांचा असल्यामुळे ऑर्किड व सोलापूर परिसरातील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने निवड होत आहे. आजपर्यंत ऑर्किडमधून एकूण 62 विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशी विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. त्या विद्यार्थ्यांची तेथील नामांकित कंपन्यांमध्ये निवड होऊन ते उत्तमरित्या आपली सेवा बजावत आहेत.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य, संस्थेचे सचिव व संस्थापक मंडळ, सर्व विभागप्रमुख तसेच प्राध्यापक वर्ग यांनी अभिनंदन व कौतुक केले.