सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील धारकरी प्रसाद पांडुरंगराव गोळे यांनी प्रचंड प्रवाह असलेल्या कॅनॉलमध्ये उडी टाकून एका संपूर्णकुटुंबाचे प्राण वाचविले आहेत.
कॅनॉलशेजारून जाणारी एक एर्टिगा गाडी अपघाताने चक्क कॅनॉलमध्ये पडली. पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगात असल्याने चक्क ही गाडीच वाहून जाऊ लागली. परिणामी त्यांचा जीव धोक्यात होता. हे पाहताच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी….
हो हो भिडे गुरुजींचा शिष्य असलेल्या श्री. प्रसाद पांडुरंग गोळे यांनी कोणताही विचार न करता क्षणात पाण्यात उडी मारली. पाण्याच्या प्रवाहामुळे ते देखील वाहून जाऊ लागले. मात्र तशा परिस्थितीतही त्यांनी गाडीतील लोकांना बाहेर काढून त्यांचे जीव वाचवले.
Post Views: 170