काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात सकाळी वॉकिंग करत असताना पडले. थोरात यांच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. त्यांना मेयो रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर दुखापत अधिक असल्याचे लक्षात आल्याने आता दुपारी १ वाजता विशेष विमानाने मुंबईला नेण्यात आलं.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे यांनी थोरात मुंबईला रवाना होण्यापूर्वी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. आज सकाळी ६ वाजता सिव्हील लाइन भागात वॉक करताना बाळासाहेब थोरात पडले. या घटनेत त्यांच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे. यानंतर त्यांना तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे एक्स-रे काढण्यात आले. यानंतर त्यांना झालेली दुखापत ही मोठी असल्याचं लक्षात आलं. यानंतर त्यांना मुंबईला उपचारासाठी रवाना करण्यात आलं आहे. बाळासाहेब थोरात हे पडल्यानंतर काही अफवाही विधान भवन परिसरात पसरल्या होत्या. थोरात यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं बोललं जात होतं. पण या अफवा असल्याची माहिती आता समोर आली आहे.