पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे नेहमीच भारतीय वेषात असतात. त्यातही वेगवेगळ्या पद्धतीची खादीचे जॅकेट्स घालताना त्यांना पाहिले आहे. मात्र आज लोकसभेत उपस्थित असताना सर्वात जास्त चर्चा झाली आहे ती मोदी यांच्या जॅकेटची. काय आहे असे यामध्ये खास? एक विशिष्ट आकाशी रंगाचे जॅकेट पंतप्रधानांनी परिधान केले होते, जे कपड्याने नाही तर प्लास्टिकच्या बाटल्यांनी रिसायकल करण्यात आले होते. या जॅकेटचीच सगळीकडे चर्चा दिसून आली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी घातलेले हे जॅकेट चर्चेत येण्याचे कारण म्हणजे हे जॅकेट कपड्यांनी न बनवता प्लास्टिकच्या बाटल्यांनी बनविण्यात आले आहे. प्लास्टिकच्या बाटल्या रिसायकल करून हे जॅकेट तयार करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वांच्याच नजरा या जॅकेटवर आज खिळल्या होत्या.
पंतप्रधान मोदीजी यांना हे जॅकेट सोमवारी भारतातील बंगळूरू येथे इंडिया एनर्जी विकदरम्यान इंडियन ऑईल कॉर्पोरेशन यांच्याद्वारे भेटवस्तू म्हणून देण्यात आले होते. पीईटी बाटल्या रिसायकल करून हे जॅकेट तयार करण्यात आल्याचे आता समोर येत आहे. इंडिया ऑईलच्या कर्मचाऱ्यांनी वस्त्र तयार करण्याकरिता १० कोटीपेक्षा अधिक पीईटी बाटल्या रिसायकल केल्या होत्या. त्यातील हे जॅकेट प्रतीक म्हणून देण्यात आले होते.