आष्टा मोड ते महाळंग्रा पाटी जवळ काळी पिवळी जीपला टेम्पोने जोरात धडक दिली. त्यामुळे जिपमधील आठ जण,टेम्पो चालक असे एकूण नऊ जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी साडे आकराच्या सुमारास चाकूर तालुक्यातील महाळंग्रा पाटी येथे घडली आहे. या अपघातात नऊ जण जखमी झाले असुन जखमींना लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काळी पिवळी जीप क्रमांक एम.एच. 24 एफ 3462 ही लातूर कडून चाकूरकडे येत होती.
काळी पिवळी जिप प्रवाशांची चढउतार करण्यासाठी महाळंग्रा पाटी येथे रस्त्यावर थांबली होती. त्यावेळी दुधाचा टेम्पो क्रमांक एम.एच. 22 व्हि.एन. 3135 हा दुधाचा टेम्पो लातूर कडून चाकूरकडे जात होता.यावेळी दुधाच्या टेम्पोची काळी पिवळीला जोरदार धडक बसली. त्यात दोन्ही वाहनाचे चालक,जीप मधील सात जण असे एकूण नऊ जण जखमी झाले. काळी पिवळीचा चालक संगमेश्वर खांडेकर, टेम्पोचा चालक अंकुश भोसले, जीप मधील प्रवासी नामदेव जाधव, मैना जाधव, इतर चारजन असे अपघातात नऊ जण जखमी झाले.
जखमींना उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.धडक एवढी जोरात होती की अपघात होताच काळी पिवळी रस्त्याच्या बाजूला जाऊन खड्ड्यात पडली. टेम्पो रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन पडला. या घटनेची माहिती मिळताच महाळंग्रा येथील सामाजिक कार्यकर्ते मार्शल माने परीसरातील नागरीकांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जखमींना पुढील उपचारासाठी लातूरला पाठवले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
महाळंग्रा पाटी जवळ या अगोदर आठ दिवसापूर्वी अपघात झाला होता. असे अपघाताचे सत्र सुरूच आहेत. यासंदर्भात महाळंग्रा येथील सरपंच मार्शल माने, कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी, एन.एच.आय.यांना निवेदन दिले होते. आपघात ठिकाणी बोगदा सोडावा मात्र त्या निवेदनाची दखल घेतली गेली नाही. आणखीन अपघाताचे सत्र सुरूच आहेत. जर येथे लवकरात लवकर उपाययोजना केली नाही तर तिव्र आंदोलन करण्याचा इशारा सरपंच मार्शल माने यांनी दिला आहे.