2020 मध्ये भारतातील झिरोदा ही यूनिकॉर्नचा दर्जा प्राप्त करणारी एक कंपनी बनली आणि कोकणी परिवारात जन्मलेले नितीन कामत हे नाव जगभरात पोहोचलं. फोर्ब्सच्या भारतातील सर्वात श्रीमंत लोकांच्या टॉप 100 यादीत ते आले. याच नितीन कामतांनी आरोग्याविषयी काही महत्वाच्या टीप्स सांगितल्या आहेत. ज्याची सध्या खूप चर्चा सुरु आहे.
नितीन कामत यांनी एक ट्विटर थ्रेड केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, जसे आपण ‘मोठे’ होतो तसे आपलं आरोग्य आपला दर्जा ठरवतो, पैसा नाही. मी गेली काही वर्षे आरोग्याविषयी थोडा विचार केला आहे. माझ्यासोबत आणि आमच्या टीमसोबत प्रयोग देखील करत आहे. मी काही स्टार्टअप्सना पाठिंबा देत आहे जे भारतीयांना निरोगी करण्यासाठी मदत करत आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.