या वेळी प्रमुख अतिथी वैज्ञानिक मा. श्री.उदय खांबेटे (चांद्रयान- 3 च्या SCL या प्रोजेक्ट चे चिप डिझाईन मुख्य ) उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गुरुजनांचा आदर करा, शिक्षणाचा पाया भक्कम करा, सांघीक काम करण्याची वृत्ती वाढवा, साॕफ्ट स्किलवर भर द्या, भरपूर खेळा, ऐकण्याचे व बोलण्याचे कौशल्य वाढवा, निरनिराळ्या संकल्पना समजावून घ्या असे मौलिक विचार मांडले. विद्यार्थ्यांना चांद्रयान- 3 मोहिमेची माहिती सांगितली तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांनाही त्यांनी समर्पक उत्तरे दिली.
तसेच याप्रसंगी अभियंता दिनाचे औचित्य साधून चंद्रयान 3 चे पेपर मॉडेल तयार करण्याची एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. हे मॉडेल कीट मा. श्री. श्रीनिवास औंधकर (संचालक, औरंगाबाद विज्ञानकेंद्र ) यांनी तयार केले आहे. कार्यशाळेत 130 विद्यार्थ्यांनी यशस्वी सहभाग नोंदवला.
विद्यार्थ्यांनी उत्तमोत्तम प्रतिकृती तयार केल्या.या कार्यक्रमास शाळा समितीचे अध्यक्ष मा श्री राजेश पटवर्धन ,मुख्याध्यापिका मा. सौ. श्रुती बागेवाडी. पर्यवेक्षिका मा. सौ. सुस्मिता तडकासे, शिशु शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. मंजिरी वडगांवकर, श्री. आनंद केसकर, सौ. वेदवती गवई, अनंत दिवाणजी तसेच शिक्षक -शिक्षकेतर वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, ओळख आणि सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. श्रुती बागेवाडी यांनी केले तर कार्यक्रमाचा समारोप शाळेच्या सहशिक्षिका सौ. वेदवती गवई यांनी आभार प्रदर्शनातून केला.