मध्य रेल्वेवर पनवेलजवळ मालगाडी घसरल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळित झाली आहे. काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. कोकणकन्या एक्स्प्रेससह मुंबईकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या अनेक गाड्या आज, १ ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आल्या आहेत.
पूर्णपणे रद्द केलेल्या आजच्या गाड्या अशा – चिपळूण-दिवा मेमू स्पेशल, पनवेल-खेड मेमू स्पेशल, खेड-पनवेल मेमू स्पेशल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव मार्गावरील मांडवी एक्स्प्रेस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी मार्गावरील गणेशोत्सव विशेष, मडगाव-मुंबई मार्गावरील कोकणकन्या एक्स्प्रेस, सावंतवाडी-दादर मार्गावरील तुतारी एक्स्प्रेस, सावंतवाडी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी, तसेच एलटीटी-मडगाव विशेष गाडी आज रद्द करण्यात आली आहे.
काही गाड्या अर्ध्या वाटेवरच रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव विशेष गाडी मुंबई ते पनवेल मार्गावरच रद्द करण्यात आली आहे. दिवा-रत्नागिरी मेमू स्पेशल गाडी कासू (जि. रायगड) येथे रद्द करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव मार्गावरील जनशताब्दी एक्स्प्रेस, तसेच नेत्रावती एक्स्प्रेस या दोनन्ही गाड्या कल्याण-पुणे-मिरज-लोंढा मार्गे मडगावकडे वळविण्यात आल्या आहेत.