आठवड्यातील मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार यादिवशी ही सेवा सुरु राहिल. चार दिवस विमानसेवा सुरु झाल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे. कोल्हापूर- मुंबई विमानसेवा आठवड्यातून चार दिवस सुरु झाली आहे. स्टार एअरचे पहिल्याच दिवशी विमान हाऊसफुल्ल झाले. स्टार एअरवेज या कंपनीकडून कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा आता आठवड्यातून चार दिवस सुरु झाली आहे. पहिल्या दिवशी मुंबईहून कोल्हापूरला 33 तर कोल्हापुरातून मुंबईला 31 प्रवाशांनी प्रवास केला. आठवड्यातील मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार यादिवशी ही सेवा सुरु राहिल. चार दिवस विमानसेवा सुरु झाल्यामुळे प्रवासी समाधानी आहेत. सातही दिवस ही विमानसेवा सुरु करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती.