महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवर आता मद्यपान केल्यास तीन महिने तुरूंगाची वारी होऊ शकते. कारण, तसा प्रस्ताव राज्य सरकार मंजुरीसाठी पाठवणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात दिलीय. गड किल्ल्यांवर मद्यपान करणाऱ्या फक्त तीन महिन्यांचा तुरूंगवासच नाही, तर सोबत दहा हजारांचा दंड ठोठावण्याचीही तयारी राज्य सरकारने केलीय. त्याचसोबत, प्रत्येक गड किल्ल्यावर हेरिटेज मार्शल नेमण्याचीही घोषणा सुधीर मुनगंटीवार यांनी केलीय. दरम्यान, या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास महाराष्ट्राच्या इतिहासाचा अमूल्य ठेवा असणाऱ्या आणि ज्यांच्या अंगाखांद्यांवर इतिहास घडला, त्या गड किल्ल्यांवर मद्यपान करून त्याचं पावित्र्य घालवणाऱ्यांना चांगलाच चाप बसेल अशी आशा निर्माण झालीय.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...