गरीब शेतकऱ्यांचं खाण्यात तूप म्हणजे करडीचे तेल समजलं जाते सध्या देगलूर तालुक्यात करडी या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून देगलूर व देगलूर परिसरातील ऑइल मिल मध्ये शेतकऱ्यांची करडी गाळण्यासाठी लगबग दिसत आहे करडीचे तेल हे खाण्यासाठी खूप उपयोगी तेल म्हणून समजलं जाते या करडीच्या तेलापासून अनेक रोग दूर होतात व शरीरातील कोलेस्टर कमी करण्याचे काम हे करडीचे तेल खाल्यामुळे होते करडीचे तेल हे शरीरासाठी अति गुणकारी म्हणून समजले जाते सध्याला बाजारात अनेक ब्रँडचे फॉर्च्यूनर तेल वापरले जाते त्या तेलामध्ये 20 टक्के केमिकल वापरल्यामुळे ते तेल पाण्यासारखे शुद्ध दिसते असे तेल खाल्ल्यामुळे हृदयविकार खूप प्रमाणात वाढले आहेत तरी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात दरवर्षी एक दोन एकर करडी या पिकाची लागवड करून त्या करडीचे तेल गाळून वर्षभर वापरल्यास हृदयविकार पासून आपण सुरक्षित राहाल असे तज्ञांचे म्हणणे आहे सध्याला शंभर किलो करडी पासून 20 ते 24 किलो शुद्ध तेल निघत आहे बाजारात करडीचे भाव चार हजार रुपये क्विंटल भेटत आहे बाजारातील भेसळयुक्त तेल दोनशे रुपये ने मिळत आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील करडी गाळून वर्षभर तेल वापरल्यास अनेक बिमारी पासून दूर राहता येईल व आपले कुटुंबातील व्यक्तींचे शरीर निरोगी ठेवता येईल.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...