फेब्रुवारी महिन्यातील दुसरा आठवडा हा प्रेमी युगुलासाठी हवाहवासा वाटणार आठवडा म्हणून ओळखला जातो. 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंतचा प्रत्येक दिवस मग त्यात प्रपोज डे, रोज डे, चॉकलेट डे, टेडी डे असे अनेक वेगवेगळे पार्टनरसोबत अधिक खास पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे‘ला पार्टनरप्रती असलेलं प्रेम व्यक्त केलं जातं.
या दरम्यान, केंद्रीय मत्स्य पालन, पशुपालन आणि डेअरी मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या पशु कल्याण मंडळाने 14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ हा ‘काऊ हग डे’ म्हणून साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. 14 फेब्रुवारीला गायीला मिठी मारून त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करावं आणि ‘व्हॅलेंटाईन डे’ हा ‘काऊ हग डे’ साजरा करावा, असं आवाहन पशु कल्याण मंडळानं केलं आहे.