शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने समाधान नगर येथील भागात गेल्या आठ ते दहा दिवसापासून पाणी आले नसल्याने या भागातील नागरिकांनी गुढीपाडवा दिवशी महापालिका गेट समोर घागरी घेऊन ठिय्या आंदोलन केले, अक्कलकोट रोड येथील समाधान नगर सह आसपासच्या नगरांमध्ये गेल्या आठ दिवसापासून पाणी आले नाही, आज गुडी पाडवा सण असून देखील पाणी सोडण्यात आले नाही, अधिकारी यांना फोन करून विचारले तर ते समाधानकारक उत्तर देत नाहीत, त्यामुळे आज संतापून समाधान नगर भागातिल महिला आणि नागरिकांनी महापालिका गेट समोर बसून आंदोलन करत घागरी फोडल्या आणि प्रशासनाचा निषेध केला, दरम्यान आम्हाला व्यवस्थित पाणी मिळावे अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे,दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पथक तेथे तात्काळ दाखल झाले, आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...