शनिवारी दिवसभर दमदार पावसाने हजेरी लावली असल्याने जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. तर तिरोडा तालुक्यातील चुरडी येथिल नाल्यावरून पाणी वाहत असताना शालिकराम प्रजापती (70) हे नाल्याजवळून जात असताना त्यांचा पाय घसरल्याने नाल्याच्या पाण्यात वाहून गेले. शनिवार सायंकाळची घटना असल्याने मृतदेह सापडला नाही. आज (रविवार) सकाळी पुन्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने बचाव कार्य सुरु करण्यात आले असून काही अंतरावर शालिकराम यांचा मृतदेह आढळून आल्याने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले आहे. तर नदी नाल्यांवर पाणी वाहत असताना सतर्क राहावे असा इशारा जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...