लातूर, -चिंचोलीराववाडी भागातील गोडाऊन फोडून चोरी केलेल्या तुरीच्या कट्ट्यासह 5 चोरट्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 7 लाख 56 हजार रुपयाचा मुद्देमाल पोलीस पथकाने जप्त केले आहे.एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचोलीराववाडी परिसरात असलेल्या एका गोदामामध्ये साठवून ठेवलेले तुरी 26 कट्टे चोरीला गेल्याची तक्रारीवरून पोलीस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हा उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पथके तयार करून चोरट्यांचा शोध घेण्यात येत होता.26 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्यातील संशयित आरोपी योगेश कृष्णा मोरे, स्वराज्य नगर वसवाडी, विवेक अशोक हनमंते, खडक हनुमान, लातूर. तानाजी गोरोबा आतकरे, स्वराज नगर, वसवाडी, लातूरआकाश उर्फ सुरज पंडितराव लोमटे, स्वराज्य नगर वसवाडी, आकाश भालचंद्र सुरवसे, खडक हनुमान यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्यांनी या गोदामची डुप्लिकेट चावी बनवून गोदाम मध्ये साठवून ठेवलेल्या धान्यापैकी तुरीचे प्रत्येकी 50 किलो वजनाचे 26 कट्टे त्यांच्या चार चाकी दुचाकी वाहनावरून चोरून नेल्याचे कबूल केले. वरील आरोपी पैकी आकाश लोमटे याच्या घरी ठेवलेले गोदाम मधून चोरलेले 26 तुरीचे कट्टे, गुन्ह्यात वापरलेले एक स्विफ्ट डिझायर कार, दोन मोटरसायकल असा एकूण 7 लाख 56 हजार 400 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या चोरट्यांना पुढील कार्यवाहीसाठी पोलीस ठाणे एमआयडीसीच्या ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डाके हे करीत आहेत.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अतिशय कुशलतेने चोरीच्या गुन्ह्याचा तपास करून गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यात चोरलेल्या मुद्देमालासह आरोपींना अटक केली आहे. ही कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन द्रोणाचार्य, सहाय्यक फौजदार संजय भोसले, पोलीस अमलदार सुधीर कोळसुरे राम गवारे, योगेश गायकवाड, सिद्धेश्वर जाधव , नाना भोंग, प्रदीप चोपणे यांनी केली आहे.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...