महाराष्ट्रात सोन्याच्या खाणींची चर्चा असताना आता इथल्याच एका गावात हिऱ्यांची खाण असल्याचा दावा भूगर्भ शास्त्रज्ञांनी केलाय गावातील ज्ञानेश्वर तिवाडे यांचे घर हिऱ्यांच्या खाणीचं केंद्र ठरलंय त्यांच्या घरातील चुलीखाली हिरांच्या खाणीचं केंद्र आहे असा दावा शास्त्रज्ञांनी केला.
या खाणीचा उत्खनन करण्यासाठी ग्रामपंचायत सरसावली आहे. भूगर्भ शास्त्रज्ञांनी 1997 मध्ये सावली तालुक्यातील घोडेवाही आणि पाथरी येथे संशोधन केलं होतं. या संशोधनात गावातील पाच किलोमीटरच्या परिघात हिऱ्यांचा साठा असल्याचा अहवालात सांगितलं होतं या सोन्याच्या खाणी सापडल्यानंतर हिऱ्यांच्या खाणीचा तपास व्हावा अशी मागणी आता गावकरी करतात.