जरांगे पाटलांनी केलेल्या सरसकट मराठा समजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचे ओबीसीकरण करण्याच्या मागणीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा तीव्र विरोध आहे. तो विरोध करीत राष्ट्रीय ओबीसी महासंघ व ओबीसी संघटनाच्याकडून चंद्रपूर येथे महामोर्चा पार पडला. यात चंद्रपूर सहीत लगतच्या यवतमाळ, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यातून मोठया प्रमाणात ओबीसी बांधवानी आपला आक्रोश व्यक्त केला.
स्थानिक गांधी चौकातून निघालेला हा सर्व पक्षीय महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला. ओबीसीच्या मागण्या राज्य सरकारनी त्वरित पूर्ण कराव्यात. यात प्रामुख्याने कुठल्याही परिस्थितीत सरसकट मराठा जात लिहिलेल्या मराठा समाजातील व्यक्तींना कुणबीजातीचे प्रमाणपत्र देऊन त्यांचे ओबीसीकरण करण्यात येवू नये. बिहार राज्याच्या धरतीवर महाराष्ट्र राज्यात ओबीसींची जातनिहाय सर्वे करण्यात यावी. संपूर्ण देशात ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची शिफारस महाराष्ट्र शासनाने केंद्रसरकार कडे करावी. यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी चंद्रपूर मार्फत राज्यपाल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री,इतर मागास बहुजन कल्याण मंत्री, पालकमंत्री ,चंद्रपूर,मुख्य सचिव, प्रधान सचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग, अध्यक्ष मागासवर्गीय आयोग ,पुणे यांना या महामोर्च्याच्या ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय सचिव सचिन राजूरकर, ऍड. पुरुषोत्तम सातपुते, ऍड. विजय मोगरे, राजेश बेले दिनेश चोखारे, सूर्यकांत खनके, डॉ. संजय घाटे, डॉ. दिलीप कामडे, विलास माथाणकर श्याम लेडे, कुसुम उदार, अनिल डहाके,कुणाल चहारे,गणेश आवारी, मनीषा बोबडे, गोमती पाचभाई,अनिल शिंदे, देवा पाचभाई,प्रेमा जोगी अक्षय येरगुडे हितेश लोडे यांच्या मार्फत चंद्रपूर उपविभागीय अधिकारी मृगूनाथन यांनी स्वीकारले.
उपरोक्त मागण्या पूर्ण करण्याकरीता राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 11 सप्टेंबर पासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत. या आंदोलनास ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तयावाडे यांनी समारोपिय भाषणात निवेदनात दिलेल्या मागण्या मंजूर झाल्या नाही तर या पेक्षा मोठे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येईल असा इशारा दिला.
विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार माजी, माजी मंत्री परिणय फुके आमदार अभिजित वंजारी, आ. किशोर जोरगेवार, आ. प्रतिभा धानोरकर,अशोक जिवतोडे,माजी आमदार देवराव भांडेकर,माजी आमदार आशिष देशमुख,माजी आ. सुदर्शन निमकर,नंदू नागरकर,पप्पू देशमुख, महेंद्र ब्राम्हणवाडे, देवराव भोंगडे,सतीश वारजूरकर, संध्या गुरनुले,रवींद्र शिंदे,राजेंद्र वैद्य, सलील देशमुख,रमेश राजूरकर,अनिल धानोरकर, किशोर टोंगे,संदीप गिऱ्हे, नितीन भटारकर आदी विविध पक्षाचे तथा विविध जातनिहाय संघटना कुणबी, तेली, माळी, सुतार, नाभिक, बारई,सोनार, कलार,धनगर, बेलदार, भावसार, शिंपी, परीट, लोहार, वाढई समाज संघटना सोबतच आरपीआय संघटनेचे समर्थक उपस्थित होते.