दिग्गज दुचाकी उत्पादक कंपनी रॉयल एनफील्डच्या बाईक भारतात खूप पसंत केल्या जातात. या बाईकचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. अशातच रॉयल एनफील्डने डिसेंबर 2022 साठी आपला विक्री अहवाल प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये कंपनीने विक्रीत 7% ची घट नोंदवली आहे. गेल्या महिन्यात डिसेंबरमध्ये कंपनीने एकूण 68,400 युनिट्सची विक्री केली होती. तर डिसेंबर 2021 मध्ये 73,739 युनिट्सची विक्री झाली होती. तसेच गेल्या महिन्यात कंपनीची देशांतर्गत विक्री डिसेंबर 2021 च्या तुलनेत 8 टक्क्यांनी घसरून 59,821 युनिट्सवर आली. तर कंपनीने डिसेंबर 2021 मध्ये 65,187 युनिट्सची देशांतर्गत विक्री झाली.
2023 मध्ये रॉयल एनफिल्ड आपल्या वाहनांच्या विक्रीला गती देण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी कंपनी लवकरच तीन नवीन बाईक बाजारात आणणार आहे. जाणून घेऊ रॉयल एनफिल्डची कोणती नवीन बाईक बाजारात येणार आहे.
Super Meteor 650 मध्ये कंपनीचे 648cc पॅरलल ट्विन इंजिन वापरण्यात आले आहे. या इंजिनसह येणारी ही तिसरी बाईक असेल. ही बाईक इटलीतील EICMA मध्ये जागतिक स्तरावर सादर करण्यात आली होती. त्यानंतर या बाईकने नोव्हेंबरमध्ये भारतात 2022 रायडर मॅनियामध्येही भाग घेतला होता. इंटरसेप्टर 650 आणि कॉन्टिनेंटल जीटी 650 सारखेच इंजिन या बाईकमध्ये वापरण्यात आले आहे. यात अपसाईड-डाउन फोर्क्स, एलईडी हेडलॅम्प आणि अॅल्युमिनियम पार्ट्स दिसतील. ही बाईक या महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे. याची किंमत सुमारे 3.5 लाख रुपये असू शकते.
रॉयल एनफील्ड लवकरच नवीन जनरेशन Bullet 350 बाजारात आणणार आहे. ही बाईक कंपनीच्या J सीरीज लाइनअपचा एक भाग असेल. यामध्येही कंपनीच्या Meteor 350, Classic 350 आणि Hunter 350 सारखेच इंजिन उपलब्ध असेल. याची किंमत सध्याच्या मॉडेलपेक्षा जास्त असू शकते.