सिल्लोड तालुक्यातील उंडणगावहून बुलढाणा जिल्ह्यातील शेखापुर लूनावर (एम एच २८ बीच ३७७९) जात असलेल्या चौघांना जळगावहून नाशिक येथे कॅरेट नेत असलेला इंट्रा (एम एच १७ बी वाय ( ८८४१) या मालवाहतूक वाहनाने छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील गोळेगाव निकट असलेल्या धोत्रा फाट्यावर जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील शेखापूर येथील दिलीप उदयभान जाधव ( ४०) हे जागीच ठार झाले असून त्यांचा मुलगा रोहन दिलीप जाधव ( १५) हा गंभीर जखमी झाला आहेत तर पत्नी चंद्रकलाबाई दिलीप जाधव ( ४०) व दुसरा मुलगा गोपाल दिलीप जाधव (१० ) हे जखमी झाले आहेत.
या दोघांना सिल्लोड येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलेले आहेत तर गंभीर असलेला रोहनला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.अपघाताची माहिती मिळताच शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुक्ताराम पाटील गव्हाणे,संदीप गव्हाणे,कृष्णा इंगळे,सागर गोपळकर,संजय काटकर,सुनील गव्हणे,पिराजी मुराडे,आदी ग्रामस्थांच्या मदतीने अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद भिंगारे,उपनिरीक्षक राजू राठोड,पोहोकॉ विकास चौधरी आदीनी जखमींना मुक्ताराम गव्हाणे व पिराजी मुराडे यांच्या वाहनात उपचारासाठी नेले.अपघाताची नोंद अजिंठा पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे.