गेल्या आठ ते दहा वर्षापासुन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ सोलापूर ते हैद्राबाद या महामार्गाचे काम अतिशय संथगतीने सुरू असून ते रेंगाळलेल्या अवस्थेत होते . याबाबत हे काम जलद गतीने पूर्ण करून तातडीने रस्ता दुरुस्त करावे व महामार्गावरील सर्व अर्धवट कामे तात्काळ सुरू करून सर्व उड्डाण पुलांची कामे, सर्विस रोडची कामे तसेच या संपूर्ण महामार्गावर पडलेले खड्डे बुजवून त्यावर नव्याने डांबरीकरण करण्यात यावे . यासह अन्य मागण्यासाठी आज दि. १९ नोव्हेंबर रोजी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या नेतृत्वाखाली जळकोट येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले .
जवळपास दीड तास हे आंदोलन चालले . आंदोलनानंतर वाहतूक सुरळीत होण्यासाठी तब्बल तीन ते चार तास लागले . यावेळी बोलताना मनसेचे जिल्हाध्यक्ष नवगिरे म्हणाले की रस्त्याची अर्धवट कामे व खड्ड्यांमुळे ज्या लोकांचे प्राण गेले त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २० लाख रुपये व ज्यांना अपघातामुळे कायमचे दिव्यांगत्व आले त्यांना प्रत्येकी१० लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी . दि ३० नोव्हेंबर पर्यंत अणदूर, जळकोट, आष्टामोड, येणेगुर, दाळिंब, रामपूरपाटी येथील खड्डे बुजवून त्याठिकाणी नवीन डांबरीकरण करावे, नळदुर्ग बायपास रोडचे काम जलद गतीने पूर्ण , जळकोट गाव जिल्हा परिषद शाळा, आलियाबाद कडे जाणाऱ्या रस्त्याची लेवल काढून चढ उतार कमी करावा, हंगरगा रोडवर मेडन ओपनिंग ठेवावे, एमएच २५ पासिंग असणाऱ्या सर्व कमर्शियल वाहनांना टोल मधून पन्नास टक्के सूट देण्यात यावी, नळदुर्ग बायपास रोडचे काम पूर्ण होईपर्यंत नळदुर्ग घाटातील जुन्या रोडवर तात्काळ अपघात नियंत्रण यंत्रणा उभारण्यात यावी जेणेकरून घाटामध्ये अपघात होणार नाहीत व झाल्यास तातडीने वाहतूक सुरळीत होईल, बोरमन तांडा येथील रस्त्यावर मेडनओपनिंग तयार करावे . असे सांगून यांसह व अन्य मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आले हे निवेदन स्वीकारण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रतिनिधी निवासी अभियंता महेश उटगे,एस टी पी एल कंपनीचे प्रकल्प प्रमुख अनिल शर्मा, मंडळ अधिकारी पी एस भोकरे, नळदुर्ग पोलीस स्टेशनचे सपोनि सिद्धेश्वर गोरे उपस्थित होते .
या आंदोलनादरम्यान एक रुग्णवाहिका आली असता आंदोलनकर्त्यांनी भाषणे सुरू असतानाही त्या रुग्णवाहिकेला रस्ता करून दिला . मनसेचे निवेदन स्वीकारल्यानंतर नवगिरे यांनी केलेल्या मागण्यांचा विचार करून एन . एच . ए . आय . च्या अधिकार्यांनी, सदर महामार्गावरील खड्डे बुजवून नवीन डांबरीकरणाचा लेयर येत्या ३० नोव्हेंबर पर्यंत केवळ अकरा दिवसात पुर्ण करण्याचे जाहीर केले .या रास्ता रोको आंदोलनासाठी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष महेश जाधव, अविनाश साळुंखे, जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, तुषार वराडे, तुळजापूर तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार, लोहारा तालुकाध्यक्षअतुल जाधव, नळदुर्ग शहराध्यक्ष अलीम शेख, सचिव प्रमोद कुलकर्णी, उपाध्यक्ष रमेश घोडके, उमरगा शहराध्यक्ष हेमंत बनसोडे, तुळजापूर तालुका संघटक गणेश पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रशांत गरड, मनविसे उपजिल्हाध्यक्ष जयकुमार घोगरे, धनंजय मडोळे, वैभव स्वामी, अजय डांबरे, विशाल घोरपडे, आकाश पटणे, मनोज लष्करे, पिंटू सुरवसे, सुनील पवार, शंकर चव्हाण, बाबू चव्हाण, सतीश राठोड, सागर राजमाने, राहुल धनशेट्टी,
भिमा राठोड, नागराज कदम, बालाजी लोखंडे यांच्यासह मनसे कार्यकर्ते, जळकोट व परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे यावेळी पोलीस बंदोबस्त ही चोख ठेवण्यात आला होता .