तालुक्यातील विटनेर येथील एका प्रार्थनास्थळावर (मजार) पाकिस्तानी ध्वज फडकवण्यात आल्याची संतापजनक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर हिंदूत्ववादी कार्यकर्ते प्रचंड संतप्त झाले. या प्रकारानंतर मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह पदाधिकार्यांनी विटनेर गावाकडे धाव घेत घडलेला प्रकार जाणून घेतला तर एमआयडीसी पोलिसांना माहिती कळाल्यानंतर पोलिस निरीक्षक जयपाल हिरे व सहकार्यांनी धाव घेत प्रार्थनावर फडकवण्यात आलेला ध्वज तातडीने ताब्यात घेतला. या प्रकरणी तक्रार देण्यात आली असली तरी गुन्हा दाखल झाला नव्हता.
बुधवारी दिवसभर विटनेर येथे पाकिस्तानह ध्वज फडकवण्यात आल्याची माहिती कळाल्यानंतर सोशल मिडीयातून याबाबत जोरदार टिकेचा सूर उमटला तर हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनीदेखील या प्रकाराविषयी तीव्र संताप व्यक्त करीत दोषींवर कारवाईची मागणी केली. सोशल मिडीयाद्वारे अनेकांनी ध्वजाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल करीत या प्रकारामागे मोठे षडयंत्र होत असल्याचा दावा करीत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.
विटनेर येथे ्रप्रार्थनास्थळावर लावलेला ध्वज पाकिस्तानी नसल्याची पूर्णपणे खात्री केली आहे. नेरी येथील व्यक्तीने श्रद्धेतून हा ध्वज लावला मात्र घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांनी ध्वज ताब्यात घेतला आहे. अनावधानातून घडलेल्या या प्रकाराविषयी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे निरीक्षक हिरे म्हणाले.