तालुक्यात आडगाव बाजार येथे शनिवारी दुपारी चार वाजता अवकाळी पावसासह वाऱ्यासह जोरदार गारा पडल्या या गारा मुळे प्रचंड शेतकऱ्यांची पिकाच्या अतोनात नुकसान झाले त्या पिकाची पाहणी करताना व माननीय परभणीचे लोकप्रिय खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी उपजिल्हाधिकारी सेलू अरुणा संगेकर मॅडम यांना दूरध्वनी वरून शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी करून तात्काळ अनुदान द्यावे असे संदेश त्यांनी देण्यात आला आहे.
यावेळी संगे कर मॅडम यांनी शेतातील शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून अहवाल शासनाकडे पाठविण्यात येईल असे खासदार साहेबांना दूरध्वनीवरून सांगण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत आडगाव तलाठी रुपेश वावळे शिवसेना तालुकाप्रमुख रामजी शर्मा दाभाडे सुंदरराव नाईक दाभाडे सुभाषराव देशमुख जगन राव दाभाडे प्रमोद दाभाडे गजानन राठोड विठ्ठल जाधव कृष्णा राठोड इत्यादी यादी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आडगाव परिसरातील शेतकऱ्यांचे सोयाबीन हरबरा गहू ज्वारी कांदा इत्यादी भाजीपाला अतोनात नुकसान झालेले आहे तरी शासनाने या पिकांची त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आडगाव परिसरातील शेतकऱ्यांनी माननीय एस डी एम अरुणा संगेकर मॅडम यांच्यासमोर मांडल्या व्यथा व शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात या यावी अशी मागणी केली आहे