वादळी वाऱ्यासह अवेळी पडलेल्या पावसात प्रचंड गारपीट होऊन तालुक्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे मा.आ.विजयराव भांबळे यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन गारपीटीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. पिकाची पाहणी केली.
आज मौजे आसेगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन भेटी दिल्या. शेतकऱ्यांनी अतोनात मेहनत करून हाती आलेले पिक गारपीट झाल्याने हातचे गेले आहे. हाती आलेले सोन्यासारखे पिक शेतकऱ्याच्या हातून गेल्यामुळे शेतकरी राजा संकटात सापडला आहे. ज्वारी, बाजरी, गहू, कांदा, लसून, भोईमुग, कापूस तसेच फळबाग पपई, संत्री, मोसंबी, अंगूर, केळी ही सर्व पिके अक्षरशः गारपिटी मुळे खराब झाली आहेत.
आपल्या तालुक्यातील गारपीट झालेली परिस्थिती आणि शेतकऱ्यांची व्यथा पाहून शेतकऱ्यांना भरघोस मदत करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते मा. अजितदादा पवार साहेब यांना तात्काळ निर्णय घेण्यास विनंती करू असे अश्वाषण मा.आ. विजयराव भांबळे यांनी शेतकऱ्यांना दिले. यावेळी सोबत मनोज थिटे रा.कॉ.पा.तालुका अध्यक्ष, रामराव उबाळे माजी जि.प.सभापती परभणी, अभिनय राऊत जि.प.सदस्य, गणेशराव ईलग पं.स.सभापती जिंतूर, सचिन राऊत, पांडुरंग पवार,हरिभाऊ गायकवाड,विश्वंबर पवार,रंगराव पवार,दत्तराव घोळवे,हनुमान पवार,दत्तराव काटकर,जगनाथ पवार,विठ्ठल पवार,अशोक पवार, दिगांबर कुटे,सुधीर देशमुख,विठ्ठल मुटकुळे, श्याम सारंग,रोशन भाई,अप्पाराव साखरे,पप्पू साखरे,सुहाश पवार,अक्षय पवार प्रकाश जव्हार,बंडू राखुंडे,अशोक फिसफिसे,पंढरी पवार,राम पवार,ज्ञानदेव पवार, व शेतकरी उपस्थित होते.