कविता कल्याणम वय 32 राहणार जुना विडी घरकुल असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. गेल्या दोन वर्षांपासून कविता कल्याणम हिचे संदीप राठोड राहणार जुना विडी घरकुल याच्याशी प्रेमसूत जुळले होते. मात्र सदरची बाब कविता कल्याणम हीच्या पतीला कळल्यानंतर पतीने आपल्या पत्नीला समज देत अशी घटना पुन्हा होऊ नये अशी ताकीद दिली होती. त्यानंतर दोघातील प्रेम प्रकरण संपुष्टात आले होते मात्र प्रियकर संदीप राठोड हा मयत कविता कल्याणम हिचा पिच्छा काय केला सोडत नव्हता.
मयत कल्याणमला वारंवार त्रास देत होता. याचा त्रासाला आणि छळाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलत कविता कल्याणम हिने राहत्या घरामध्ये सकाळी साडेसहा वाजता गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दरम्यान याबाबत कल्याणम यांचे नातेवाईक शेजारी तसेच रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांनी अधिक माहिती देताना सदर घटना घडवून देखील एक दिवस उलटला तरीही अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही असे सांगत एम आय डी सी पोलिसांनी तात्काळ तपास करून आरोपीला अटक करावी अशी मागणी केली आहे.