ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रूक्मिणी सातारकर ऊर्फ माई सातारकर यांचे आज अल्पशा आजाराने निधन झालं आहे. नवी मुंबई (नेरूळ) येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 85 वर्षांच्या होत्या. अध्यात्माच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी बाबा महाराजांबरोबर त्यांनी सक्रिय योगदान दिले आहे. त्यांच्या पार्थिवावर नेरूळमधील स्मशानभूमीत सायंकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सातारकर परिवाराचे निकटवर्ती माजी नगरसेवक शिवराम पाटील यांनी दिली.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


















