Wednesday, April 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

‘व्हॉटसअॅपवर प्रायव्हसी हवी असेल तर फेसबुक अकाउंट डिलीट करा, फेसबुकच्या वकिलांचा अजब युक्तिवाद…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 2, 2023
in india
0
‘व्हॉटसअॅपवर प्रायव्हसी हवी असेल तर फेसबुक अकाउंट डिलीट करा, फेसबुकच्या वकिलांचा अजब युक्तिवाद…
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जर तुम्हाला व्हॉट्सअॅपवर प्रायव्हसी हवी असेल तर फेसबुक अकाउंटच डिलीट करा, असा युक्तिवाद फेसबुकच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात केला आहे. व्हॉट्सअॅप युजर्सचा फक्त काही डेटा फेसबुकवर शेअर केला जातो आणि जर वापरकर्त्यांना संपूर्ण गोपनीयता हवी असेल तर त्यांनी फेसबुकवर खाते न ठेवता व्हॉट्सअॅप वापरावे, असे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात सांगितले.

फेसबुक-व्हॉट्सअॅपच्या प्रायव्हसी धोरणावरून सुप्रीम कोर्टात बुधवारी सुनावणी झाली. त्यावेळी फेसबुकच्यावतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. व्हॉटस अॅपच्या 2016 मधील प्रायव्हसी धोरणाला याचिकेतून आव्हान देण्यात आले आहे. फेसबुकने 2014 मध्ये व्हॉट्सअॅप खरेदी केल्यानंतर 2016 पर्यंत व्हॉट्सअॅप युजर्सचा डेटा वेगळा ठेवला होता. त्यानंतर 2016 मध्ये व्हॉट्सअॅप आणि फेसबुकने प्रायव्हसी धोरणात बदल केला. जेणेकरून मेटा डेटा (युजर्सचा फोन क्रमांक) हे दोन्ही अॅपमध्ये शेअर केले जाऊ शकतात.

सुप्रीम कोर्टात न्या. केएम जोसेफ, न्या. अजय रस्तोगी, न्या. अनिरुद्ध बोस, न्या. हृषिकेश रॉय आणि न्या. सी. टी. रवी कुमार यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान व्हॉट्सअॅपने न्यायालयाला सांगितले की, व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांचे कोणते मोबाइल नंबर व्हॉट्सअॅपवर केव्हा आणि कसे नोंदवले गेले. ते ऑपरेट करतात, फक्त त्याची माहिती सामायिक केली जाते. याशिवाय इतर कोणतीही माहिती ते शेअर करत नाहीत.

दाव्यानुसार, व्हॉट्सअॅप युजर्सची काही निवडक माहिती फेसबुकला देण्यात येईल. त्यानंतर फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरत असताना कंपनीला युजर्सना लक्ष्याधारीत जाहिरात दाखवणे सोपं होऊ शकते.

या सुनावणी दरम्यान, वरिष्ठ वकील अरविंद दातार यांनी, मी सोशल मीडियाचा वापर करत नाही. मात्र, व्हॉट्सअॅपचा वापर करतो. तर, फेसबुकला माझ्याबाबत काय माहिती असणार? असा प्रश्न केला.

प्रायव्हसी हवी असेल तर व्हॉट्सअॅप युजरकडे फेसबुक खाते नसावे. युजर्सला जर व्हॉट्सअॅपचा वापर करणे सोडून देता येत नसेल तर त्याने किमान त्याचे फेसबुक अकाउंट बंद करावे असे कोर्टात सांगण्यात आले.

2016 मध्ये व्हॉट्सअॅप युजर्सचा डेटा फेसबुकला देण्याच्या धोरणाच्या विरोधात दोन विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. सोशल मीडिया अॅप्समधील हा करार युजर्सच्या प्रायव्हसीचा भंग असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला असल्याचा दावा याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांनी केला आहे.

फेसबुक या सोशल मीडिया अॅपचा सर्वाधिक डाऊनलोड होणाऱ्या अॅपमध्ये समावेश आहे. फेसबुकने मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप खरेदी केले. त्यानंतर इन्स्टाग्राम हे अॅपदेखील खरेदी केले. त्यानंतर या कंपन्यांना मेटा या कंपनीच्या छत्राखाली एकत्र आणले.

Post Views: 86
Previous Post

ज्येष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी माई सातारकर यांचं निधन; वयाच्या 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

Next Post

ज्येष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी माई सातारकर यांचं निधन; वयाच्या 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
ज्येष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी माई सातारकर यांचं निधन; वयाच्या 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

ज्येष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी माई सातारकर यांचं निधन; वयाच्या 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

ताज्या बातम्या

पालिकेच्या 47 अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुन्हा दंड

April 22, 2026

बालमाता प्रकरणी आत्तापर्यंत 34 घटना उघड

April 22, 2026

शासकीय कर्मचाऱ्यांनी पूनम गेट समोर केली निदर्शने

April 22, 2026

रुग्णांचा अर्ज आल्यावर सहायता निधीला आठ तासात मिळणार मंजुरी

April 22, 2026

अमोल शिंदे चेतन नरोटे यांच्या निलंबनानंतर पुढच्या सभेत होणार सहभागी

April 22, 2026

पेट्रोल टाकून पेटवून दिलेल्या पत्नीचा सात दिवसानंतर झाला मृत्यू

April 22, 2026

पारध येथील दोन युवकांची उल्लेखनीय कामगिरी ; पोलीस व मनपा सेवेत निवड

April 22, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

April 22, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0823633

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697