ज्येष्ठ शिवसैनिकाची उपचारासाठी मुख्यमंत्र्यांना हाक,शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी रोख एक लाखाची केली मदत,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉल द्वारे ज्येष्ठ शिवसैनिकाशी साधला संवाद
सोलापूर एसटी कामगार सेनेचे माजी विभागीय सचिव अरुण कामतकर यांची शिवसेनेकडे औषधोपच्या मदतीसाठी आर्त हाक दिली आहे. कामतकर हे मनक्याच्या आजारामुळे दोन वर्षापासून अंथरुणाला खिळून आहेत. ते एसटी कामगार सेनेचे माजी पदाधिकारी आहेत. मी हाडाचा शिवसैनिक आहे. दोन वर्षापासून आजारी आहे. औषधोपचाराला पैसा नाही. मला मदत करा, अशी आर्त हाक एका शिवसैनिकाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावली होती.
या घटनेची माहिती मिळताच सोलापूर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी ज्येष्ठ शिवसैनिक अरुण कामतकर यांची भेट घेतली आणि त्यांना रोख एक लाख रुपये दिले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व्हिडिओ कॉल द्वारे माहिती देत ज्येष्ठ शिवसैनिक कामतकर यांचा संवाद करून दिला. जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.