येत्या काही दिवसात तुम्ही विमान प्रवास करण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्याकडे एक चांगली संधी आहे. Go फर्स्ट एअरलाइन तुम्ही ट्रेन तिकिटाच्या किंमतीत विमान प्रवास करण्याची सुवर्ण संधी घेऊन आली आहे. याशिवाय तुम्ही फक्त काही हजार रुपयांच्या खर्चात विदेश प्रवासही करू शकतात.
गो फर्स्टने ट्रॅव्हल इंडिया, ट्रॅव्हल सेल तिकिटांची विक्री सुरू केली आहे. तुम्ही फक्त रु. ११९९ भरून तुमचे फ्लाइट तिकीट बुक करू शकता. आजपासून म्हणजेच १६ जानेवारीपासून तिकिटांची विक्री सुरू झाली आहे. लक्षात घ्या की GoFirst पूर्वी विस्तारा, इंडिगो सारख्या एअरलाइन्सने देखील प्रवाशांना अशाच ऑफर दिल्या होत्या. सवलती दरांत विमान तिकिटांची विक्री १९ जानेवारीपर्यंत सुरु असेल.
GoFirst एअरलाइनने आजपासून आपली ट्रॅव्हल इंडिया, ट्रॅव्हल सेल सुरू केली असून या काळात इच्छूक प्रवासी १६ ते १९ जानेवारी दरम्यान तिकीट बुकिंग करू शकतात. दरम्यान या ऑफर अंतर्गत तुम्ही १,१९९ रुपयात तिकीट बुकिंग करून स्वस्त दरात देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करण्यासाठी तिकीट बुक करू शकता. देशांतर्गत प्रवासासाठी तिकीट बुकिंग ११९९ रुपयापासून सुरु असून आंतरराष्ट्रीय तिकिटाच्या सुरुवातीची किंमत ६,५९९ रुपये आहे.
Go फर्स्ट एअरच्या या खास ऑफर अंतर्गत तिकीट बुक करून तुम्ही ४ फेब्रुवारी ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत प्रवास करू शकता. म्हणजेच, या सेलद्वारे तिकीट बुकिंग करत तुम्ही तुमच्या सुट्टीची आगाऊ (ॲडव्हान्स) प्लॅनिंग करू शकता आणि या ऑफरचा लाभ घेऊ शकता. या सेलबाबत GoFirst चे सीईओ कौशिक खोना म्हणाले की, “लोकांना परवडणाऱ्या, आरामदायी प्रवासाचा आनंद देण्याचा आमचा उद्देश आहे.” विशेष म्हणजे प्रवाशांना या ऑफरमध्ये त्यांचा प्लॅन रीशेड्युल करण्याचा देखील पर्याय मिळत आहे. म्हणजेच तुमचा प्लॅन रद्द झाला तर तुम्ही तुमचा प्लॅन री-शेड्युल करू शकता.


















