पञकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी या मागणी बरोबरच इतर मागण्यांसाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख सर यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्हा पत्रकार संघ व ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ तर्फे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
पञकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी, पञकार हल्याचे खटले जलदगती न्यायालया मार्फत चालवली जावेत, पाचोरा चे आ.किशोर पाटील यांच्यावर कारवाई करावी, आदी मागण्यासाठी पञकारांनी एकञीत येऊन आंदोलन केले .तसेच जिल्हाधिकारी निवेदन देण्यात आले.
शासनाने पञकार संरक्षण कायद्याची प्रभावी व कडक अमंलबजावणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, सचिव नारायण शेट्टी, मराठी पत्रकार परिषद ठाणे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख संजय साळुंखे, कार्याध्यक्ष विकास काटे, सरचिटणीस निलेश पानमंद, क्रिस्तू फर्नांडिस, राजेश लोखंडे, धनेश पाटील, विरेंद्र शुक्ला युनूस खान, अशोक घाग, दिनेश शुक्ला गणेश यादव, नितीन दूधसागर सह आदी सहभागी झाले होते.