ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातल्या पिराणी पाडा परिसरात शनिवारीमध्यरात्रीनंतर एका 3 मजली इमारतीला आग लागली. ही आग एवढी भीषण होती की, आगीचे लोळ दूरवरुण दिसत होते. ही आग येथील फळांच्या कॅरेटला लागली. यानंतर आगीने उग्र उग्र रूप धारण करत बाजूला असलेल्या तीन मजली इमारतीला देखील कवेत घेतले. दरम्यान या इमारतीतल्या रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून कुठल्याही जीवीत हानीचे वृत्त नाही.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी पोहचले. मध्यरात्री लागलेल्या यामुळं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. स्थानिकांना आगीची माहिती मिळताच त्यांनी इमारतीमधील रहिवाशांना सुखरुप बाहेर काढले. यानंतर अग्निशामक दलाला याची माहिती मिळताच तब्बल चार ते पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाणी मारून आग नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात येत नव्हती. त्यामुळे आणखी काही फायर गाड्यांना बोलावण्यात करण्यात आले. दरम्यान, एका तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीच्या घटनेदरम्यान, एक पोलीस कर्मचारी खड्ड्यात पडल्याने जखमी झाला आहे. ही आग नेमकी कशी लागली याची माहिती मिळू शकली नाही. सध्या कुलिंगचे काम सुरू आहे. आगीच्या घाटेमुळे परिसरात भीतीचे वातावरण झाले होते. ही आग शॉर्टसर्किट मुळे लागली की कुणी लावली याचा तपास पोलिस करत आहेत.