मोहोळ ( प्रतिनिधी )तक्रारदार आणि त्यांचे मित्राची अडत दुकानातील धान्याचे वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी तहसीलदार च्या वतीने मासिक हप्त्याची लाचेची २५हजार रुपयांची रकमेची मागणी केल्याने दाजी श्रीमंत काकडे (रा .काकडे वस्ती मोहोळ) याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सायंकाळी अटक केली. या घटनेने मोहोळ मध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व त्याचा मित्र यांचे मोहोळ तालुक्यामध्ये आडत दुकान आहे .त्या दुकानांमध्ये आडत धान्य व्यवसायाच्या खरेदी विक्री अनुषंगाने गहू ज्वारी तांदूळ आधी धान्याची वाहतूक करावी लागते. ही वाहतूक टेम्पो, छोटा हत्ती, अशा वाहनातून तेही मोहोळ हद्दीतून होत आसते. सदर वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई होऊ नये यासाठी मी तत्कालीन तहसीलदार प्रशांत बेडसे यांना सांगतो असे म्हणून खाजगी इसम आरोपी दाजी श्रीमंत काकडे (रा.काकडे वस्ती मोहोळ) याने तत्कालीन तहसीलदार प्रशांत बेडसे याच्यासाठी मासिक हप्ता म्हणून २५ हजार रुपये मागणी केली होती.
यासाठी १५ जून पासून सापळा रचण्यात आला होता आणि गुरुवार दि.३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ही रक्कम स्वीकारण्यास संमती दिली . त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे- खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार, पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी आणि उमाकांत महाडिक , पोलीस कॉन्स्टेबल शिरीष कुमार सोनवणे श्रीराम घुगे नरोटे शाम सुरवसे गायकवाड यांनी पार पाडले .