राज्यभरात तलाठी भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन परीक्षा सुरु आहे. परंतु अमरावतीमध्ये सोमवारी या परीक्षेच्या दरम्यान परीक्षार्थींची चांगलाच गोंधळ उडाला. सकाही ९ ते ११ या परीक्षेची वेळ असताना देखील सर्व्हर डाऊनमुळे वेळेत परीक्षा सुरु होऊ शकली नाही. शहरातील सिटीलँड तसेच तक्षशिला पॉलिटेक्निक कॉलेज या दोन केंद्रावर सर्व्हर डाऊनच्या तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा वेळेत सुरु होऊ शकला नाही. त्यामुळे परीक्षार्थींनी मनस्ताप व्यक्त केला.
राज्यातील ४ हजार ६४४ तलाठींच्या रीक्तपदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. या परीक्षेसाठी राज्यात तब्बल १० लाख ४१ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीमध्ये रोज तीन सत्रामध्ये ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत आहे. अमरावती शहरात आठ केंद्रावर ही परीक्षा होत आहे. सोमवारी मात्र पहिल्याच सकाळच्या ९ ते ११ या परीक्षा सत्रामध्ये परीक्षार्थींचा चांगलाच गोंधळ उडाला.
शहरातील सीटीलँड आणि तक्षशीला पॉलिटेक्निक कॉलेज या दोन केंद्रावर परीक्षार्थी वेळेत परीक्षा केंद्रावर पेाहचल्यानंतरही सर्व्हर डाऊनमुळे वेळेत परीक्षाच सुरु झाली नाही. तर इतर केंद्रावर मात्र परीक्षा सुरु झाली. त्यामुळे परीक्षार्थींना परीक्षेची वेळ होऊन देखील परीक्षा केंद्राबाहेरच थांबवे लागले. तब्बल एक तासाने तांत्रिक बिघाड दुर झाल्यानंतर परीक्षा सुरळीत सुरु झाली. परंतु पहिल्याच सत्रात झालेल्या या गोंधळाच्या परिस्थितीमुळे इतर सत्रामधील परीक्षेचे नियोजनही बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परीक्षा घेणाऱ्या कंपनीविरुद्ध नाराजी व्यक्त केली जात आहे.
यासंदर्भात माहिती देताना मंजुश्री भुयार यांनी सांगितले की, आजच्या पेपरचा सकाळी साडे सात वाजताची रिपोर्टींग चा टाइम होता. मात्र सकाळी ९.२५ पर्यंत हॉल मध्ये प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे सगळे विध्यार्थी बाहेर थांबलो होतो. टेक्निकल प्रॉब्लेम असल्याचे सांगितल्या जात आहे. मात्र आम्ही विद्यार्थ्यानी काय करावे ? राज्य सरकार कडून परीक्षा घेणेच होत नसतील तर त्यांनी परीक्षाच घेऊ नये केवळ परीक्षेच्या नावावर पैसे गोळा करण्याचे काम महसूल विभाग करीत आहे. जेंव्हा एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षा सेंटरवर यायला पाच मिनिट उशीर झाला तर त्याचे रिपोर्टींग करीत नाही व त्याला परत पावल्या जाते व आज मात्र सर्व्हर डाऊन आहे तर याची जवाबदारी कोणी घ्यायला तयार नाही. याची पण जवाबदारी राज्य सरकारने घ्यावी अशी संतप्त प्रतिक्रिया या वेळी विद्यार्थ्यांनी दिली.