परंडा (-श्रीराम विद्वत) हिम्मत असेल तर तानाजी सावंत यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन निवडून येवुन दाखवावे अनामत रक्कम जप्त झाल्याशिवाय राहणार नाही तसेच माढ्याचे पार्सल परत पाठविल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही असा इशारा शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी रविवार (दि.५) आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे परंडा मतदारसंघातील माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदा वरुन अपात्र ठरविण्यात आले या पार्श्वभूमीवर मा.आ.पाटील यांनी विश्वसिध्दी येथील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होति.यावेळी जिल्हाप्रमुख गौतम लटके, जनार्दन मेहेर, मैनोद्दीन तुटके आदी उपस्थित होते.
तानाजी सावंत यांना बोटाला धरून जिल्ह्याच राजकारण शिकवल व परंडा मतदारसंघात राजकारणात संधी देऊन आमदार केले.त्यांनीच माझे आजारपणाचा फायदा घेवुन मी आय.सी.यु.मध्ये असताना जिल्हा बँकेच्या संचालक पदाचे मला नोटीस पाठवुन त्रास देण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न केला. ७ फेब्रुवारी रोजी तारीख ठेवलेली असताना त्याची नोटीस मला १० फेब्रुवारी रोजी देण्यात आली. मी पुणे येथील रुग्णालयात ११ फेब्रुवारी रोजी पर्यंत आयसीयु मध्ये असताना सावंत यांनी कपटी राजकारण केले व नोटीसला उत्तर देण्याची मला संधी दिली नाही.सावंत यांनी कपटाने रचलेला डाव तालुक्यातील जनता उधळुन लावल्याशिवाय राहणार नाही.आगामी काळात सावंतच्या माध्यमातून आलेले पार्सल परत पाठविल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.
धनंजय सावंताच्या खांदयावर गुलाल टाकण्याच पहिले काम मी केले त्यासाठी स्वतःच्या भावाला सिध्देश्वर पाटील यास जिल्हा परिषदेची उमेदवारी न देता सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांना उमेदवारी दिली व निवडुन आणलं तसेच जिल्हा परिषदेत सभापती केले.या काळात तानाजी सावंत आमदार सुध्दा नव्हते.तालुक्यातील शेतक-याच्या हितासाठी कारखाना आणला सावंताना आलेल्या सगळ्या अडचणी सोडविण्यासाठी अनेकांचा विरोध पत्कारूण मी पुढाकार घेतला.ज्यांनी हाताला धरून उभे केले त्यांनी आपल्याला त्रास देण्याची भुमिका घेतली.
[]पालकमंत्री तानाजी सावंत यांनी मला व माझे कुटुंबियांना त्रास देण्याच्या दुष्ट हेतुने शासकीय यंत्रणेचा वापर करुन कर्मचा-यांवर दबाव टाकुन तथ्यहिन प्रकारणी खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला. भविष्यात माझ्यासह माझ्या मुलावर खोटया केसेस करण्याची शक्यता नाकारता येत नाही.”सत्ता येत असते जात असते सत्तेचा माज येवु दयायचा नसतो, सावंताना आलेला पैश्याचा अन सत्तेचा माज थोडयाच दिवसात जनता उतरवेल असा मला विश्वास आहे.