कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी आज नांदेड शहराच्या दौऱ्यावर होते. यावेळी कार्यक्रमात एका वयोवृद्ध आजीने खासदारांना अडवून त्यांच्या घराच्या बिकट परिस्थितीची माहिती दिली. या वेळी खासदार डॉ.शिंदे यांना आपण नक्की नवीन घर बांधून देतो असे सांगून आजीकडून सर्व माहिती घेतली. भावूक झालेल्या आजींनी खासदारांना जवळ घेत तुमच्याशिवाय आमचा आधार नाही, असे भावनिक विधान केले. राज्यातील सध्याचे सरकार आणि त्यांचे लोकप्रतिनिधी हे सर्वसामान्यांना वाटतात. आपले प्रश्न फक्त सरकारच सोडवू शकते आणि त्यांचे प्रश्न लगेच सुटतात या भावनेने लोक येतात. आजच्या घटनेवरून पुन्हा त्याची प्रचिती आली.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...